सर्दी, खोकला यांसारखे संसर्गजन्य आजार अधिक प्रमाणात असतात.
घरातील एका व्यक्तीला सर्दी, खोकला झाला तर तो इतरांनाही होतो.
त्यामुळे थंडीत आपल्या घशाची योग्य काळजी घेणे आवश्यक असते.
जर घसा खराब झाला तर घसादुखी, खवखव, आणि सुजेचा त्रास होतो.
यासाठी काही उपाय उपयुक्त ठरू शकतात.
घसा स्वच्छ ठेवण्यासाठी कोमट पाणी पिणे फायदेशीर असते.
घसा खवखवत असल्यास कोमट पाण्यात मीठ घालून गुळण्या कराव्यात.
गरम दुधात हळद घालून प्यायल्याने घशातील संसर्ग दूर होतो.
हळद ही जंतुनाशक असल्यामुळे इंफेक्शनसाठी रामबाण उपाय ठरते.
टीप: वरील माहिती केवळ वाचक म्हणून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.