सकाळी-सकाळी आवळा ज्यूस पिण्याचे फायदे काय?

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: pexels

आयुर्वेदात आवळ्याचे अनेक गुणधर्म सांगितलेत. आवळ्याला भारतीय करवंद किंवा अमृत फळ असंही म्हणतात. आवळा खाणं आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं.

Image Source: pexels

आवळ्याचा रस आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो.

Image Source: pexels

आवळ्यात व्हिटॅमिन सी, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्सह अनेक औषधी गुणधर्म आहेत.

Image Source: pexels

अशा या बहुगुणी आवळ्याचा ज्युस सकाळी पिणं अत्यंत फायदेशीर ठरतं.

Image Source: pexels

सकाळच्या वेळेत आवळा ज्यूस प्यायल्यानं शरीराची रोगप्रतिकारशक्ती खूप वेगानं वाढते.

Image Source: pexels

याव्यतिरिक्त, सकाळी आवळा ज्यूस प्यायल्यानं तुमची त्वचा आणि केसांसाठीही अनेक फायदे मिळतात.

Image Source: pexels

आवळ्याच्या ज्यूसमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट आणि जीवनसत्त्व केस मजबूत आणि त्वचा चमकदार बनवतात.

Image Source: pexels

सकाळच्या वेळेत आवळा ज्यूस पिणं पचनासाठी चांगलं मानलं जातं, ते पोटाच्या समस्या... जसं की बद्धकोष्ठता, अॅसिडिटी आणि गॅस दूर करते.

Image Source: pexels

आवळ्याचा रस वजन कमी करण्यास मदत करतो, तो चयापचय क्रिया गतिमान करतो आणि शरीरातील विषारी घटक बाहेर काढतो.

Image Source: pexels

सकाळच्या वेळेत आवळा ज्यूस पिणं मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे, हा ज्यूस रक्तातील साखरेची पातळी संतुलित ठेवतो.

Image Source: pexels

(टिप : वरील सर्व बाबी केवळ माहिती म्हणून वाचक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही...)