पण काही आरोग्य स्थितींमध्ये ते शरीरासाठी नुकसानकारक ठरू शकते.
मधुमेहाचे रुग्णानी सेवन मर्यादित करावे किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
मूत्रपिंडाच्या रुग्णांनी टरबूज जास्त खाल्ल्यास पोटॅशियम आणि पाण्याचं प्रमाण वाढून त्रास होऊ शकतो, त्यामुळे ते मर्यादित खावं.
जास्त कलिंगड खाल्ल्याने पोट फुगणे, गॅस किंवा जुलाब होऊ शकतात.
फळातील साखर (फ्रुक्टोज) पचत नसल्यामुळे पोट फुगणे, अस्वस्थता किंवा जुलाब होऊ शकतात.
जर तुम्हाला वारंवार सर्दीचा त्रास होत असेल, तर कलिंगड लक्षणे आणखी वाढवू शकते.
कलिंगडाची थंड प्रकृती दमा वाढवू शकते, तर टायरामाइन मायग्रेनला चालना देऊ शकते.
सर्वांसाठी सर्व हेल्दी पदार्थ योग्य नसतात. तुमच्या शरीराला काय मानवते, ते निवडा.