सुक्या मेव्याचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर आहे. ड्रायफ्रुट्समध्ये अक्रोड हे सुपरफूड मानलं जातं.

Image Source: istock

यामध्ये ओमेगा-3 फॅटी ॲसिड, अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांसारख्या पोषकतत्त्वे भरपूर प्रमाणात असतात.

अक्रोडमध्ये विशेषत: अल्फा-लिनोलेनिक ॲसिड असते, ज्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते.

रोज भिजवलेले अक्रोड खाल्ल्याने शरीरातील नसा मजबूत होतात आणि अशक्तपणा दूर होतो.

भिजवलेले अक्रोड खाणे त्वचेपासून स्मरणशक्तीपर्यंत सर्व दृष्टीने फायदेशीर ठरते.

अक्रोडातील पोषक तत्वे टिकवून ठेवण्याचा उत्तम मार्ग म्हणजे ते पाण्यात भिजवून खाणे.

कच्च्या अक्रोडात फायटिक ऍसिड नावाचे एक संयुग असते

जे शरीराला लोह आणि जस्त सारख्या खनिजांचे शोषण करण्यापासून प्रतिबंधित करते. भिजल्याने ही संयुगे निष्क्रिय होतात.

भिजवल्याने अक्रोड मऊ होतात आणि एंजाइम सक्रिय होतात, ज्यामुळे ते अधिक पचण्याजोगे बनतात.

टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. कोणताही उपाय किंवा तज्ज्ञ किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावीत.