जर तुम्ही शरीराला भरपूर फायदे मिळावेत, यासाठी भरपूर फळं खात असाल तर त्यामुळे होणारं नुकसान नक्की जाणून घ्या.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: Pinterest

फळे हा नेहमीच आरोग्यदायी पर्याय मानला जातो

आरोग्य तज्ज्ञ नेहमी फळांचा आहारात समावेश करण्याचा सल्ला देतात. यामुळे आरोग्यासाठी अनेक फायदे होतात.

Image Source: Pinterest

वेगवेगळ्या प्रकारची फळे खाल्ल्याने वेगवेगळे फायदे मिळतात.

या फळांमध्ये भरपूर जीवनसत्त्वे, खनिजे, पोटॅशियम, अँटिऑक्सिडंट गुणधर्म आणि फायबर असतात.

Image Source: Pinterest

मात्र, जास्त फळे खाणे हे देखील तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकते.

फळे जास्त प्रमाणात खाल्ल्याने आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात.

Image Source: Pinterest

फळांमध्ये नैसर्गिक साखर आढळते आणि काही फळांमध्ये उच्च कॅलरीज देखील असतात.

अशा परिस्थितीत, जास्त प्रमाणात फळे खाल्ल्याने पुढील समस्या उद्भवू शकतात.

Image Source: Pinterest

बहुतेक फळांमध्ये फ्रक्टोज मोठ्या प्रमाणात असते.

अशा परिस्थितीत जास्त प्रमाणात फ्रक्टोज सेवन केल्यास इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता आणि मधुमेह होऊ शकतो.

Image Source: Pinterest

नियमितपणे जास्त प्रमाणात फळे खाल्ल्याने चरबीचा संचय होऊ शकतो, ज्यामुळे लठ्ठपणा होऊ शकतो.

याशिवाय ते ब्लडप्रेशर आणि युरिक ॲसिडची पातळी देखील वाढवते.

Image Source: Pinterest

जास्त प्रमाणात फळांचे सेवन केल्याने बऱ्याचदा इरिटेबल बोवेल सिंड्रोम (IBS) होतो.

याच्या लक्षणांमध्ये पोटदुखी, गोळा येणे, अपचन, बद्धकोष्ठता आणि अतिसार यांचा समावेश होतो.

Image Source: Pinterest

तसेच अनेक फळे खाल्ल्याने काही फळांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्याने अपचन होऊ शकते.

Image Source: Pinterest

टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. कोणताही उपाय किंवा तज्ज्ञ किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावीत.

Image Source: Pinterest