कमी आर्द्रता आणि हिटर इत्यादींमुळे वातावरण कोरडे होते.
अशा परिस्थितीत डोळ्यांतील ओलावा कमी होऊन ते कोरडे होऊ लागतात.
हिवाळ्यात त्वचा कोरडी पडली की त्यावर खुणा दिसू लागतात, ॲलर्जी होऊ लागते.
तसेच डोळ्यांच्या बाबतीतही असेच घडते.
विशेषतः लहान मुलांमध्ये ही समस्या अधिक दिसून येते.
हिवाळ्यात डोळ्यांची काळजी घेण्याच्या टिप्स जाणून घ्या.
कोमट पाण्याने डोळे स्वच्छ करा.
पण हे एक-दोन वेळा करा त्याहून जास्त वेळ करू नका.
हिवाळ्यात कमी पाणी प्यायल्याने शरीरात डिहायड्रेशन होते.
त्यामुळे डिहायड्रेशन टाळण्यासाठी दिवसभर पुरेसे पाणी प्यावे.
थंड वारे आणि हानिकारक अतिनील किरणांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी चष्मा घाला.
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. कोणताही उपाय किंवा तज्ज्ञ किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावीत.