या कुटुंबात मुलं आणि त्यांचे आई-वडील राहतात.
या कुटुंबाची तिसरी पिढी म्हणजेच आजी-आजोबा एकतर दुसऱ्या शहरात राहतात किंवा मग गावी एकटे राहतात.
बहुतेक वेळा एकाकीपणा हे नैराश्याचे मुख्य कारण बनतात.
तारुण्यातच काही गोष्टींची काळजी घेतल्यास तर नैराश्याची समस्या बऱ्याचपैकी कमी होऊ शकते.
म्हातारपणी नैराश्य येऊ नये म्हणून पुढील 5 गोष्टी जाणून घ्या.
नैराश्य टाळण्यासाठी, तुमच्या दिनक्रमात एक छंद नक्कीच समाविष्ट करा. यासह तुम्ही स्वतःसाठी आणि तुमच्या निवडींसाठी वेळ काढा.
एकाकीपणाचा सर्वात जास्त त्रास व्यक्तीला म्हातारपणी होतो. अशा स्थितीत आतापासूनच एक चांगला दिनक्रम ठरवला पाहिजे. दिवसभरात कोणत्या वेळी काय कराल हे निश्चित करा. यामुळे तुमचा दिवस सुरळीत जाईल.
म्हातारपणी नैराश्य टाळायचे असेल तर आत्तापासून थोडा वेळ स्वतःसाठी काढा. किमान अर्धा तास ध्यान करा. योग आणि ध्यान करा, यामुळे नैराश्याची समस्या टाळता येईल.
म्हातारपणात तंदुरुस्त राहण्यासाठी रोज व्यायाम किंवा योगा जरूर करावा. याने शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहील.
तारुण्यात जर सकस आहार खाल्ले तर म्हातारपणात होणारे आजार बऱ्याच अंशी कमी होणार. चांगल्या आहाराने मानसिक आरोग्य चांगले राहते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.