यासाठी अनेकजण नियमित जिमला जातात.
वेगवेगळ्या प्रकारचे डाएट फॉलो करतात.
मात्र, तरीही त्यांना हवा तसा रिझल्ट मिळत नाही.
सकाळच्या दिनचर्येचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होतो यासाठी पुढील पेय प्या
हळद कर्क्यूमिन प्रदान करते, जे जळजळ कमी करण्यास मदत करते. त्याचबरोबर काळी मिरी मेटाबॉलिज्म वाढवून फॅट बर्न करण्याचे काम करते. हे दोन्ही एकत्र खाल्ल्याने वजन कमी होते.
सब्जाचे पाणी प्यायल्याने तुम्ही प्रथिने मिळवू शकता आणि ते फायबर आणि ओमेगा 3 फॅटी ऍसिड सारखे आवश्यक पोषक देखील प्रदान करते.
लठ्ठपणा, हाय बीपी, शुगर, कमकुवत रोगप्रतिकारक शक्तीशी झुंज देत असाल तर सकाळी कोरफडीचा रस पिणे चांगले.
दालचिनीचा चहा रक्तातील साखर नियंत्रित करते आणि इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता कमी करते. हे प्यायल्याने पचनशक्ती वाढते आणि पोटाच्या समस्या दूर होतात.
ग्रीन टी अँटिऑक्सिडंट्सने भरलेली असते जे तुमचे चयापचय वेगवान करण्याबरोबरच वजन कमी करण्यास मदत करते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.