त्याचबरोबर आहारशास्त्रात, दूधला संपूर्ण अन्न म्हणतात.
तज्ज्ञांकडून, लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला आहारात दूध समाविष्ट करण्याचा सल्ला दिला जातो.
दूध थंड प्यावं की गरम, सकाळी, संध्याकाळी की रात्री प्यावं असा प्रश्न अनेकांच्या मनात उद्भवतो.
दुधात प्रथिने, कॅल्शियम, झिंक, मॅग्नेशियम यांसारखे अनेक पोषक घटक असतात.
अनेकांना गरम दूध प्यायला आवडतं तर काहींना थंड दूध प्यायला आवडतं.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, दूध गरम आणि थंड अशा दोन्ही प्रकारे पिणं फायदेशीर आहे.
उन्हाळ्यात थंडपणा मिळण्यासाठी दिवसा थंड दूध पिऊ शकता.
उष्ण वातावरणात थंड दूध प्यायल्यास उष्णतेपासून आराम मिळेल.
तसेच हिवाळ्यात रात्री कोमट दूध प्यायल्यानं फायदा होतो.
आयुर्वेदानुसार प्रौढांसाठी दूध पिण्याची योग्य वेळ झोपण्यापूर्वी आहे.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.