हृदयापासून किडनीपर्यंत रक्त नीट पोहोचत नसल्याने पाय, टाच आणि पोटात सूज येऊ लागते. हार्ट फेल्युअरच्या अवस्थेत शरीरात पाणी साचायला लागते.
कोणतेही शारीरिक कष्ट न करता जर नेहमी थकवा जाणवत असेल, तर ते हार्ट फेल्युअरचे लक्षण असू शकते. हृदय शरीरातील विविध अवयवापर्यंत पुरेसे रक्त पोहोचवू शकत नाही तेव्हा स्नायूंना ऊर्जा मिळत नाही.
हार्ट फेल होण्यापूर्वी शरीर श्वास घेण्यात अडचण निर्माण करतो. सुरुवातीला ही समस्या फक्त हालचाली करताना जाणवते.