पुणे शहरात गुलेन बॅरी सिंड्रोम या आजाराच्या रूग्णांमध्ये वाढ होत आहे.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: Meta Ai

त्यामुळे पुणे महानगरपालिका आवश्यक त्या उपाययोजना करत आहे.

Image Source: Meta Ai

ज्या भागात जास्त रूग्णसंख्या आहे, त्या भागातील पाण्याची तपासणी केली जात आहे.

Image Source: Meta Ai

दूषित पाणी किंवा शिळं अन्न खाल्यावर संसर्ग होऊ शकतो.

Image Source: Meta Ai

गुलेन बॅरी सिंड्रोमची लक्षणे दिसून आलेल्या रुग्णांमध्ये दूषित अन्न आणि पाण्यातून लागण झाल्याचे स्पष्ट झालं आहे.

Image Source: Meta Ai

पोटदुखी, अतिसार, मळमळ किंवा उलट्या, ताप ही संसर्गाची लक्षणे आहे.

Image Source: Meta Ai

हा आजार शरीरातील नसांवर परिणाम करतो.

Image Source: Meta Ai

काय काळजी घ्यावी?

पाणी उकळून प्यावे.

Image Source: Meta Ai

उघड्यावरील अन्न खाणे टाळावे.

Image Source: Meta Ai

हातापायाच्या स्नायूंमध्ये अशक्तपणा जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image Source: Meta Ai

तज्ज्ञांच्या मते 1-3 आठवड्यांनी गुलेन बॅरी सिंड्रोमचे निदान होते.

Image Source: Meta Ai

टीप : वरील सर्व माहिती प्राथमिक स्वरुपाची असून काहीही समस्या जाणवल्यास वैद्यकीय तज्ज्ञांकडून सल्ला घ्यावा. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.

Image Source: Meta Ai