लिंबाची साल

लिंबाची साल ही त्वचेच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. लिंबाच्या सालीमध्ये व्हिटॅमिन C असते आणि अँटीऑक्साईडसारखे मुख्य घटक असतात.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: pinterest

स्क्रब

साखर, मध , आणि लिंबाची साल एकत्र करून बारीक पावडर करा आणि त्वचेवर लावा. यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील डाग जातील आणि चेहरा चमकदार होईल.

Image Source: pinterest

फेस पॅक

दही, हळद, आणि ताजी लिंबाची साल या सर्वांची पेस्ट करून चेहऱ्याला लावा. यामुळे तुमच्या चेहऱ्यावर ग्लो येईल.

Image Source: pinterest

टोनर

लिंबाच्या सालीला पाण्यात उकळवा, त्यानंतर पाणी थंड होऊ द्या. तेच पाणी तुमच्या चेहऱ्यावर टोनर म्हणून लावा.

Image Source: pinterest

तेल

लिंबाच्या सालीला 2 आठवडे तेलामध्ये ठेवा आणि त्यानंतर त्याचा त्वचेवर दररोज वापर करा.

Image Source: pinterest

कोरफडीचे जेल आणि लिंबाची साल

कोरफडीचे जेल अन लिंबाच्या सालीचे एकत्र मिश्रण करा आणि त्वचेवर लावा. यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील डाग कमी होतील आणि पिंपल्स निघून जातील.

Image Source: pinterest

चमकदार त्वचा बनवा

लिंबाच्या सालीमुळे त्वचेचा रंग उजळतो आणि चेहऱ्यावरील त्वचा सुरेख आणि सुंदर बनवते, यासोबतच कोलेजेन वाढवते.

Image Source: pinterest

टीप : वरील सर्व बाबी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.

Image Source: pinterest