प्रत्येक घरातील किचनमध्ये उपलब्ध असणारे आले ह्रदयरोग ते मायग्रेनसह अनेक गंभीर आजारांवर रामबाण उपाय आहे. हिवाळ्यात बदलच्या वातावरणामुळे लोक जास्त आजारी पडतात, त्यामुळे निरोगी राहण्यासाठी आल्याचे सेवन केले जाते. आल्याचे सेवन आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.यामध्ये व्हिटॅमिन सी, मॅग्नेशियम आणि इतर अनेक पोषकतत्वे आहेत. आल्यामध्ये लोह, कॅल्शियम, फॉस्फरस, जस्त, तांबे, मँगनीज, क्रोमियम, पोटॅशियम यांसारखे अनेक पोषक घटक मुबलक प्रमाणात आढळतात. आल्याचे सेवन केल्याने अनेक आजार दूर होतात. सर्दी-खोकल्यावर हे अत्यंत गुणकारी आहे. आले बॅक्टेरिया आणि बुरशीजन्य संसर्गाशी लढण्यास देखील मदत करते. त्यामुळे पोटाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो. बद्धकोष्ठता, गॅस, वेदना आणि जुलाब यापासूनही आराम मिळतो. आल्यामध्ये आढळणारे फेनोलिक ॲसिड पोटाची जळजळ आणि ॲसिडिटी कमी करते. आले आपली पचनशक्ती मजबूत करते. आल्यामध्ये आढळणारे अँटी-ऑक्सिडंट्स मेंदूतील सूज दूर करून स्मरणशक्ती सुधारण्यास मदत करतात. यामुळे अल्झायमरसारख्या गंभीर आजाराची समस्या दूर होते. मायग्रेनमुळे डोकेदुखीचा त्रास होत असेल तर आल्याचा चहा प्या. यामुळे प्रोस्टॅग्लँडिनचे प्रमाण कमी होते आणि असह्य वेदनांपासून आराम मिळतो. आले कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते. याचे सेवन केल्याने तुम्ही हार्ट अटॅक सारख्या समस्यांचा धोका कमी करू शकता. टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही