दारूमुळे शरीरातील साखर कमी होते, त्यामुळे थकवा आणि चक्कर येऊ शकते. अशावेळी ताज्या फळांचा रस पिणं खूप उपयोगी ठरतं. हे रस मेंदूला काम करायला ताकद देतात.
दारूमुळे शरीर डिहायड्रेट होतं. म्हणूनच हँगओव्हरपासून लवकर मुक्त व्हायचं असेल, तर दिवसात अनेक वेळा पाणी प्या. थोडं थोडं करून पिणं जास्त फायद्याचं ठरतं.
पुदिना हे नैसर्गिक औषध आहे. 3-4 पुदिन्याची पानं गरम पाण्यात टाकून उकळा आणि गाळून प्या. त्यामुळे मळमळ, थंडी वाटणं आणि डोकेदुखी कमी होते.
आल्यात नैसर्गिक डिटॉक्स गुणधर्म असतात. आलं उकळून त्याचा चहा बनवा किंवा गरम पाण्यात त्याचा रस टाकून प्या. त्यामुळे शरीरातली घाण बाहेर पडते आणि तुम्ही फ्रेश वाटता.