रात्री उशिरा जेवण्याची ही सवय आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे.
रात्री उशिरा जेवल्यामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात, ज्या भविष्यात गंभीर बनू शकतात. रात्रीचे जेवण उशिरा जेवण्याचे तोटे आणि रात्रीचे जेवण करण्याची योग्य वेळ कोणती आहे, ते जाणून घ्या.
रात्री उशिरा जेवल्याने आपली पचनसंस्थेला पूर्ण आराम मिळत नाही, त्यामुळे ॲसिडीटी, गॅस, बद्धकोष्ठता यासारख्या समस्या उद्भवू शकतात. रात्री आपली पचनक्रिया मंदावते आणि अन्नाचे पचन व्यवस्थित होत नाही. त्यामुळे अनिद्रेचा त्रासही होऊ शकतो.
रात्री खाल्लेले अन्न शरीरात चरबीच्या रूपात साठते, त्यामुळे वजन वाढण्याची समस्या उद्भवू शकते. विशेषत: जर तुम्ही झोपायच्या आधी खाल्ले तर हा त्रास आणखी वाढतो.
रात्री उशिरा जेवण केल्याने झोपेचा त्रास होऊ शकतो. पोट जड झाल्यामुळे झोप येत नाही आणि यामुळे झोप पूर्ण होत नाही.
रात्री उशिरा अन्न खाल्ल्याने चयापचय क्रिया मंदावते. यामुळे शरीरातील कॅलरी बर्न होण्याची प्रक्रिया मंदावते.
रात्री उशिरा जेवण केल्याने वजन वाढते, ज्यामुळे तुमच्या हृदयालाच्या आरोग्यावर परिणाम होऊन त्याला हानी पोहोचते.
रात्री उशिरा खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी चढ-उतार होऊ शकते, ज्यामुळे मधुमेहाचा धोका वाढतो.
रात्रीचे जेवण झोपण्याच्या किमान दोन-तीन तास आधी करावे. म्हणजेच रात्री 10 वाजता झोपण्याची वेळ असल्यास रात्रीचे जेवण 7 वाजेपर्यंत झाले पाहिजे. तुमच्या जीवनशैलीनुसार या वेळेत थोडाफार बदलू होऊ शकतो.
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. कोणताही उपाय किंवा तज्ज्ञ किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावीत.