मशरुमची भाजी आपल्यापैकी अनेकांना आवडते, हेल्दी डाएटमध्ये आवर्जुन मशरूमचा समावेश केला जातो.
Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
मशरूममध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात, म्हणून अनेकजण त्याचा आहारात समावेश करतात.
प्रोटिन्स, व्हिटॅमिन्स, पोटॅशियम, फॉस्फरस आणि अँटिऑक्सिडंट्स यांसारखे अनेक पोषक घटक मशरूममध्ये आढळतात.
पण, तुम्ही कधी विचार केला आहे का? मशरूम व्हेज आहेत की नॉनव्हेज?
मशरूमचा समावेश बुरशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वनस्पतींच्या गटात होतो.
दरम्यान, मशरूमला बुरशी (fungi) म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्यामुळेच मशरुमला भाजी म्हणता येत नाही, कारण त्याची जैविक श्रेणी आणि रचना वनस्पतींपेक्षा वेगळी आहे.
मशरूम बुरशीच्या श्रेणीत येतं. बुरशी ही वनस्पती आणि प्राणी यांच्यातील एक वेगळा वर्ग आहे आणि त्यांच्या पेशी वनस्पतींच्या पेशींपेक्षा भिन्न आहेत.
मशरूम ही एक बुरशी आहे आणि त्यात अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात.
मशरुममधील पोषक घटक मानवी शरीरासाठी अत्यंत फायदेशीर मानले जातात.
मशरूम एक विशेष प्रकारचं जीवाणू (बुरशी) आहेत, जे मृत पदार्थ आणि इतर स्त्रोतांवर अवलंबून असतात.
त्याची रचना देखील वनस्पतींपेक्षा वेगळी आहे, जसं की त्यात क्लोरोफिल नाही आणि त्यातील पेशी वनस्पतींपेक्षा वेगळ्या आहेत.
म्हणून, जैविक वर्गीकरणानुसार, मशरूम एक बुरशीचा एक गट मानले जातात आणि त्यांचा भाज्यांच्या गटात समावेश केला जात नाही.
वरील बाबी केवळ माहिती म्हणून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत, यातून ABP माझा कोणताही दावा करत नाही.