महिलांना थायरॉईडमुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. थायरॉईड समस्येचे प्रामुख्याने तीन प्रकार येतात. हायपोथायरॉइड, हायपर थायरॉइड आणि गलगंड हे होय. हायपोथायरॉईड आणि हायपर थायरॉईडचा त्रास अधिक होतो. हायपोथायरॉईडमध्ये वजन वाढणं, भूक मंदावणे यासह मासीक पाळीच्याही समस्या येऊ लागतात. हायपरथायरॉईड मध्ये आवश्यकतेपेक्षा अधिक संप्रेरकांचा स्राव होतो. चिडचिडेपणा, स्वभावातील चिंताग्रस्तता वाढून उष्णतेचा त्रास होऊ लागतो. कोणत्या कारणांमुळे थायरॉईड होतो? कॅफीनचे अधिक सेवन केल्याने थायरॉईडचा त्रास वाढतो. महिला वर्गाला प्रसूतीनंतर हा त्रास अधिक वाढतो. स्वयंप्रतिरोधक रोगामुळे शरीरातील थायरॉईडचे प्रमाण कमी अधिक होते. दुसऱ्या काही आजारांची औषधे असतील तरीही थायरॉईडचा त्रास वाढू शकतो. थायरॉईड बरा होऊ शकतो का? हो. योग्य औषधोपचार च्या सहहाय्याने थायरॉईड बरा होतो. औषधांच्या माध्यमातून 80 ते 90 टक्के रुग्ण बरे होतात. टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )