प्रत्येक आंब्यामध्ये वेगवेगळ्या प्रमाणात गोडवा असतो.
काही आंब्यांमध्ये इतर आंब्यांपेक्षा कमी गोडवा असतो, तर काहींमध्ये जास्त गोडवा असतो.
त्यामुळे मधुमेह रूग्णांनी योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, आंब्यातील नैसर्गिक साखरेमुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जर शरीरातील साखरेची पातळी नियंत्रणात असेल तर तुम्ही आंबा खावा नाहीतर आंबा खाणे टाळावे.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, मधुमेह रूग्णांनी आंबा शक्यतो सालीसकट खाणे गरजेचे आहे कारण सालीत असणारे कार्बोहायड्रेट पचतात.
मधुमेही रुग्णांनी रोज अर्ध्यापेक्षा जास्त आंबा खाणे टाळावे.
जर रक्तातील साखर जास्त प्रमाणात असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच आंब्याचे सेवन करावे.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.