रोज सकाळी 'या' पदार्थाचं सेवन करा, झटपट वजन कमी करण्यासोबत भन्नाट फायदे

रोज सकाळी उठल्यावर चिया सीड्सचे सेवन करा. यामुळे तुमच्या शरीराचा प्रत्येक अवयवाला शक्ती मिळेल.

चिया सीड्स आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत, ज्यामुळे शरीराला खूप फायदा होतो.

चियाच्या सीड्समध्ये असलेल्या फायबरमुळे पोट बराच काळ भरलेले राहते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

चिया सीड्समध्ये कॅलरी कमी आणि फायबर जास्त असते. चियाच्या बियांमध्ये असलेल्या फायबरमुळे पोट बराच काळ भरलेले राहते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

चियाच्या सीड्समध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स फ्री रॅडिकल्सशी लढण्यास मदत करतात, जे वृद्धत्व वाढवतात, म्हणून याच्या सेवनाने तुमची त्वचा तरुण राहण्यासही मदत होते.

चिया सीड्स केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यामुळे तुमच्या केसांना पोषण मिळून तुमचे केस मजबूत होतात.

WebMD नुसार, चिया सीड्समध्ये मॅग्नेशियम आणि फॉस्फरस असते.

जर तुम्ही इतर कॅल्शियम युक्त पदार्थांसोबत चिया सीड्सचे सेवन केले तर तुमची हाडे वृद्धापकाळापर्यंत मजबूत राहतात.



28 ग्रॅम चिया सीड्स तुमच्या दैनंदिन कॅल्शियमचे 14 टक्के प्रमाण पूर्ण करतात जे निरोगी हाडे, स्नायू आणि मज्जासंस्थेसाठी आवश्यक असतात.

टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. कोणताही उपाय किंवा तज्ज्ञ किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावीत.