आले हे आरोग्यासाठी खूप चांगले असते.



आल्यामध्ये कार्बोहायड्रेट, फायबर, प्रथिने, जीवनसत्त्वे बी 3 आणि बी 6, लोह, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी असे अनेक पोषक घटक असतात.



पण अतिप्रमाणात आल्याचे सेवन केल्याने तुम्ही आजारी पडू शकता.



उष्ण वातावरणात आल्याचे सेवन केल्याने शरीरात उष्णता येते.



आल्याचे जास्त सेवन केल्यास पोटात जळजळ,अॅसिडिटी,गॅस आणि बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.



आल्यामध्ये रक्त पातळ करणारे गुणधर्म असतात,त्याचे जास्त सेवन रक्त गोठण्यास प्रभावित करू शकते.



आल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक कमी होऊ शकते.



गर्भवती महिलांनी आल्याचे सेवन टाळावे.



रात्रीच्या वेळी आल्याचा चहा पिण्यामुळे झोपेची समस्या उद्भवू शकते.



आल्याचा वापर शक्य तितक्या मर्यादित प्रमाणात करा.