किवी हे फळ आरोग्यासाठी भरपूर पोषक आहे.
किवी खाल्ल्याने शरीराला आवश्यक जीवनसत्त्वे मिळतात, ज्यामुळे शरीरात ऊर्जा वाढते.
किवीमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के, फोलेट, पोटॅशियम ही पोषकतत्वे आढळतात.
किवीमध्ये आढळणारी जीवनसत्त्वे आणि खनिजे मज्जासंस्था आणि रक्ताभिसरणात मदत करतात.
त्यामुळे डोळ्यांचे रक्ताभिसरण चांगले राहते. याच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.
किवीमध्ये केळीपेक्षा जास्त कॅलरीज आणि पोटॅशियम आहे.
एका किवीमध्ये जवळपास 85 मिलीग्रॅम व्हिटॅमिन C असतं. याशिवाय व्हिटॅमिन के आणि ई यांनीसुद्धा हे फळ परिपूर्ण आहे.
किवी खाल्ल्याने आयर्न आणि फॉलिक अॅसिड असते, ज्यामुळे शरीर निरोगी राहते. याचे सेवन केल्याने त्वचेवर ग्लो येतो.
यामुळे हाडे देखील मजबूत होतात. याच्या सेवनाने रक्तातील ग्लूकोजचे प्रमाण कमी होते आणि मानसिक तणावही कमी होतो.
किवीमध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते आणि कॅलरीज खूप कमी असतात, त्यामुळे वजन कमी होण्यासही मदत होते.
किवीमध्ये व्हिटॅमिन ए आढळते. यामध्ये व्हिटॅमिन सी चे प्रमाण संत्र्याच्या दुप्पट असते. किवीमध्ये फायबर असते ज्यामुळे पचनशक्ती वाढते.
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.