ऑफिसमधला ताण वाढण्यामागे अनेक कारणे असू शकतात.
जसे की कमी पगार, चांगल्या कामाचे कौतुक न होणे, सहकाऱ्यांशी मतभेद, चांगल्या संधी न मिळणे, इत्यादि
आजकाल ऑफिसमधील कामाच्या ताणामुळे व्यक्तीच्या वैयक्तिक आयुष्यावर परिणाम होतो.
तणावामुळे तुमच्या आरोग्यालाही गंभीर नुकसान होते. ताण कसा कमी करावा जाणून घेऊया.
कामाचा अतिरिक्त ताण कमी करण्यासाठी काही दिवस कामातून ब्रेक घ्या. स्वतःसाठी वेळ काढा.
रोज सकाळी काही वेळ ध्यान करा. तणाव कमी करण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे.
तुम्ही तुमच्या कामाच्या शिफ्ट व्यतिरिक्त ऑफिसच्या कामाला किती वेळ देऊ शकता ते ठरवा.
दररोज थोडा वेळ व्यायाम केल्याने तुमचे मानसिक आरोग्यही सुधारेल आणि तुम्ही चांगले काम करू शकाल.
मानसिक आरोग्यावर खूप परिणाम होत आहे तर तुम्ही एखाद्या व्यावसायिकाला भेटून या संदर्भात सल्ला घ्यावा.
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )