स्वयंपाकाचं तेल पुन्हा पुन्हा वापरता येऊ शकतं का?

भजी.. पापड...फ्राईज.. असे विविध तेलात तळलेले पदार्थ

जोपर्यंत ताटात येत नाहीत, तोपर्यंत काही जणांना जेवण गोड लागत नाही.

पण तुम्हाला माहित आहे का? अनेक हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमध्ये

तेच तेल पुन्हा पुन्हा वापरले जाते.

इतकेच नाही तर एकदा वापरलेले तेल घरांमध्ये सुद्धा पुन्हा वापरले जाते.

मात्र, तुमची ही सवय तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

खरं तर, वनस्पती तेल वारंवार गरम केल्याने' गंभीर नुकसान होऊ शकते.

नुकताच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल रिसर्चने याबाबत धक्कादायक खुलासा केला आहे.

आयसीएमआरने म्हटले आहे की तेल पुन्हा वापरल्याने

हृदयरोग आणि कर्करोगाचा धोका वाढतो.