लहानांपासून वृद्धांपर्यंत जिलेबी खाणं सगळ्यांना आवडतं.
ती गरम दूध, थंड दही किंवा राबडीसारख्या गोष्टींसोबत खाल्ली जाते.
गोड स्ट्रीट फूड म्हटलं की, सर्वप्रथम जिलेबीचंच नाव घेतलं जातं.
जिलेबीत फॅट, कार्ब्स, प्रथिने, साखर, सोडियम, फायबर आणि कोलेस्ट्रॉल मोठ्या प्रमाणात असतात.
चव जरी भारी असली तरी जिलेबी आरोग्याला पोषक नाही.
१०० ग्रॅम जिलेबीत जवळपास ३५६ कॅलरी असतात.
जिलेबीमुळे रक्तातील साखर झपाट्याने वाढते.
या कॅलरीज मुख्यतः मैदा, साखर आणि तेलातून येतात.
जिलेबीमुळे मधुमेह, कोलेस्ट्रॉल वाढ आणि हृदयविकारांचा धोका असतो.
फॅट आणि कॅलरीमुळे वजन वाढण्याची शक्यता अधिक असते.