खजूर (Dates) खाल्ल्यानं शरीराला झटपट ऊर्जा मिळते.

Published by: जगदीश ढोले
Image Source: pinterest

खजूरचे तसे अनेक फायदे आहेत. पण, सर्वात महत्वाचं म्हणजे, खजूर खाल्ल्यानं वजन कमी होते.

Image Source: pinterest

मात्र, खजूर खाण्याची योग्य वेळ आणि खजूर कसं खायचं? हे तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे.

Image Source: pinterest

खजूरमध्ये फायबर, प्रथिनं, लोह, मॅग्नेशियम आणि इतर अनेक आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजं असतात.

Image Source: pinterest

खजूरमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं. ते खाल्ल्याने पचनशक्ती मजबूत होते.

Image Source: pinterest

खजूर खाल्ल्यानं चयापचय क्रिया जलद होते. यामुळे शरीरातील कॅलरी झटपट बर्न होतात.

Image Source: pinterest

खजूर खाल्ल्यानंतर जास्त वेळ भूक लागत नाही. पोट भरलेलं राहतं. त्यामुळे जास्त खाणं टाळता येतं.

Image Source: pinterest

वजन कमी करण्यासाठी खजूर खात असाल तर लक्षात ठेवा खजूर सकाळी किंवा दिवसभरात खावेत.

Image Source: pinterest

सकाळी खजूर खाल्ल्यानं दिवसभरातील कॅलरी नियंत्रणात राहतात. रात्री खजूर खाणं टाळावं.

Image Source: pinterest

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Image Source: pinterest