डोळे हे अतिशय नाजूक असतात.

Published by: जयदीप मेढे
Image Source: IStock

डोळ्यांबाबत कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा महागात पडू शकतो.

Image Source: Pexels

आहाराच्या सवयी आणि जीवनशैलीमुळे डोळ्यांच्या समस्या झपाट्याने वाढत आहेत.

Image Source: Pexels

डोळ्यांच्या कोणत्याही समस्येकडे दुर्लक्ष करू नये असा सल्ला वारंवार डॉक्टरांकडून देण्यात येतो.

Image Source: Pexels

डोळे संवेदनशील असल्याने डोळ्यांच्या संबंधित कोणत्याही समस्येकडे दुर्लक्ष केल्यास तर अंधत्व येऊ शकते.

Image Source: Pexels

डोळे दुखण्याची समस्या

तज्ज्ञांच्या मते डोळ्यांचा त्रास कोणत्याही वयात होऊ शकतो. त्यामुळे लहानपणापासूनच डोळ्यांकडे लक्ष देणं गरजेचं आहे. सध्याच्या काळात लोकांमध्ये ग्लूकोमाची समस्या झपाट्याने वाढत आहे.

Image Source: Pexels

धूसर दृष्टी

वाढत्या वयाबरोबर होणारी मोतीबिंदूची समस्याही डोळ्यांची दृष्टी हिरावून घेते. त्यामुळे डोळ्यांशी संबंधित काही लक्षणे दिसल्यास सावध राहणं गरजेचं आहे.

Image Source: Pexels

डोळ्यांच्या मज्जातंतूंमध्ये समस्या

डोळ्यांच्या मज्जातंतूंच्या समस्यांमुळे अंधत्व येऊ शकते. वेळेवर उपचार केल्याने ही समस्या दूर केली जाऊ शकते.

Image Source: Pexels

डोळा दुखी

डोळ्यांच्या अनेक आजारांमुळे वेदना वाढू शकतात. डोळ्यांना दुखापत झाल्यामुळे वेदना होऊ शकतात.

Image Source: Pexels

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: Pexels