भात निश्चितच आरोग्यदायी आणि संतुलित आहाराचा भाग आहे. पण रोज भात खाल्ल्याने कालांतराने काही दुष्परिणाम होऊ शकतात जे लक्षात येत नाहीत.
रोज भात खाणे आरोग्यासाठी चिंतेचे कारण बनू शकते, ते तुम्ही किती प्रमाणात खाता, भाताचा प्रकार कोणता आहे आणि तुमची जीवनशैली आणि चयापचय क्रिया कशी आहे यावर अवलंबून असते.
पांढरा भात कार्बोहायड्रेट्समध्ये उच्च असतो, ज्यामुळे रक्तातील ग्लुकोजची पातळी झपाट्याने वाढू शकते. मधुमेहाचे व्यवस्थापन करणाऱ्या किंवा इन्सुलिन प्रतिरोधक असलेल्या लोकांसाठी हे धोकादायक असू शकते.
भात कॅलरीयुक्त असतो आणि तो रोज खाल्ल्यास, विशेषतः जास्त प्रमाणात खाल्ल्यास, हालचालींचा समतोल नसल्यास हळू हळू वजन वाढू शकते.
भात पिकांमध्ये इतर धान्यांपेक्षा जास्त आर्सेनिक - दूषित घटक शोषले जातात. आर्सेनिकच्या दीर्घकाळ संपर्कात राहिल्यास कर्करोगाचा धोका वाढू शकतो.
वारंवार भात खाल्ल्याने पचनसंस्थेच्या समस्या, जसे की बद्धकोष्ठता, पोटात गॅस होणं, पोट गच्च वाटणे असे प्रकार होऊ शकतात. विशेषतः फायबरयुक्त पदार्थांबरोबर न खाल्ल्यास या समस्या होतात.
पांढरा भात फायबर आणि प्रोटीनसारख्या आवश्यक पोषक तत्वांमध्ये कमी असतो, जे स्नायूंच्या आरोग्यासाठी आणि ऊर्जा पातळी स्थिर ठेवण्यासाठी महत्त्वाचे आहेत.
बैठी जीवनशैली असल्यास रोज भात खाल्ल्याने हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी समस्या, जसे उच्च रक्तदाब, पक्षाघात आणि हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढू शकतो.
या धोक्यांपासून वाचण्यासाठी, भात कमी प्रमाणात खा, ब्राऊन किंवा लाल तांदूळ निवडा आणि बाजरी, क्विनोआ आणि ओट्स सारख्या इतर धान्यांबरोबर त्याचे सेवन करा.