शेंगदाणे प्रोटीन, फायबर, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स यांनी समृद्ध स्रोत आहेत, जे आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. नियमित सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि हृदयाचे आरोग्य अधिक मजबूत होते.
शेंगदाण्यामध्ये मोनोअनसॅच्युरेटेड आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स असतात, जे वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यात मदत करतात. त्यामुळे हृदयविकारांचा धोका कमी होतो आणि हृदय अधिक निरोगी राहते.
शेंगदाण्यामध्ये भरपूर प्रोटीन आणि फायबर असल्यामुळे पोट जास्त वेळ भरल्यासारखे वाटते. यामुळे भूक नियंत्रणात राहते आणि अति खाणे टाळता येते. म्हणून वजन कमी करण्याच्या आहारात शेंगदाण्यांचा नक्की समावेश करावा.
शेंगदाण्यामध्ये व्हिटॅमिन-ई आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त असतात. हे वृद्धत्वाची लक्षणे कमी करण्यात मदत करतात आणि त्वचेला आवश्यक ती मॉइश्चरायझेशन करतात. नियमित सेवनामुळे केस अधिक मजबूत आणि निरोगी होतात.
शेंगदाण्यामध्ये ट्रिप्टोफॅन नावाचा घटक असतो, जो आनंददायी हार्मोन्सची मात्रा वाढवतो. नियमित शेंगदाणे खाल्ल्याने मूड सुधारतो आणि मानसिक ताण-तणाव कमी होतो. सलग 21 दिवस शेंगदाणे खाल्ल्यास तणावात मोठ्या प्रमाणात घट होते आणि मन प्रसन्न राहते.
शेंगदाण्यामध्ये झिंक आणि सेलेनियमसारखी खनिजे असतात, जी शरीराची रोगप्रतिकारशक्ती बळकट करण्यात मदत करतात. त्यामुळे मौसमी आजार आणि व्हायरल इन्फेक्शनपासून संरक्षण मिळणं शक्य होतं.
शेंगदाणे तुम्ही थेट खाऊ शकता किंवा सॅलड, स्मूदी, किंवा चाटमध्ये मिसळूनही आनंदाने खाऊ शकता. मात्र तळलेले किंवा खारट शेंगदाणे टाळावेत कारण त्यात फॅट आणि मीठ जास्त प्रमाणात असू शकते.