टोमॅटो आपल्या जेवणाला केवळ स्वादच नाही तर आकर्षक रंगही देतो. तो वर्षभर बाजारात सहज उपलब्ध असतो आणि त्यामुळे स्वयंपाकघरात हमखास असतोच.
Published by: जगदीश ढोले
Image Source: pinterest
टोमॅटोपासून आपण ग्रेव्ही, चटणी, सलाड, सूप, सॉस यांसारख्या विविध प्रकारच्या रेसिपी तयार करतो. तसेच तो भाजी, कालवण, टोमॅटो भुर्जी, अंडा ऑम्लेट, सॅंडविच अशा अनेक पदार्थांमध्ये मुख्य घटक म्हणून वापरला जातो.
Image Source: pinterest
टोमॅटोमध्ये फॉस्फरस, कॅल्शियम, पोटॅशियम, व्हिटॅमिन C, अँटीऑक्सिडंट्स आणि अँटीइंफ्लेमेटरी घटक असतात.
Image Source: pinterest
हे सर्व पोषकतत्त्वं आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात — विशेषतः इम्युनिटी वाढवणं, पचन सुधारणं आणि त्वचेसाठी याचा उपयोग होतो.
Image Source: pinterest
काही लोक आहारात अति प्रमाणात टोमॅटोचा वापर करतात, जो आरोग्यासाठी कधी कधी धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे संतुलित प्रमाणातच टोमॅटोचा वापर करणे योग्य ठरेल.
Image Source: pinterest
टोमॅटोत जास्त प्रमाणात कॅल्शियम ऑक्सोलेट नावाचा घटक असतो. टोमॅटोचा जादा वापर आहारात केल्याने तुम्हाला किडनी स्टोनची समस्या होऊ शकते.
Image Source: pinterest
ज्या लोकांना आधी पासूनच मुतखड्याचा त्रास असेल तर त्यांनी टोमॅटो वर्ज्य करावेत असे आयुर्वेदात म्हटले आहे. त्यामुळे किडनी डॅमेजचा देखील धोका असतो.
Image Source: pinterest
टोमॅटो एसिडिक तत्वामुळे जास्त सेवन केल्याने गॅस्ट्रीक एसिड तयार करण्याचे काम करते. अशा तु्म्ही जर जास्त टोमॅटो खाल्ले तर तुमच्या छातीत जळजळ, एसिडीटी, एसिड रिफलक्स आणि पचनाशी जोडलेल्या समस्या तयार होऊ शकतात.
Image Source: pinterest
टोमॅटोत सोलनिन नावाचे अल्कलॉइड आढळते. यामुळे तुमच्या सांध्यात सूज आणि दुखू शकते.
Image Source: pinterest
टोमॅटोत हिस्टामाइन नावाचे तत्व आढळते. ज्यामुळे शरीरात एलर्जीची समस्या निर्माण होऊ शकते.
Image Source: pinterest
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )