अनेकदा रस्त्यावरून जाताना एखादा पाणीपुरीचा ठेला दिसला तर पाय तिथेच थबकतात.
वजन कमी करण्यापासून ते मानसिक आरोग्यापर्यंत अनेक समस्यांवर पाणीपुरी रामबाण उपाय ठरते.
पाणीपुरी खाण्याचे 4 फायदे नेमके कोणते ते जाणून घेऊया.
वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत असाल, तर तुम्ही पाणीपुरीचा डाएटमध्ये समावेश करु शकतात. पण पाणीपुरी खाताना रव्याच्या पुऱ्याऐवजी पीठाच्या पुऱ्यांचा वापर करा.
शरीरातील उष्णता वाढल्यामुळे माऊथ अल्सरची समस्या उद्भवते. पाणीपुरीचं पाणी तयार करताना जलजिऱ्यातील तिखट आणि पुदिन्यातील आंबट पदार्थांमुळे माऊथ अल्सरपासून सुटका मिळवण्यास मदत होते.
अनियमित जीवनशैलीमुळे अनेकांना अॅसिडीटीचा सामना करावा लागतो. अॅसिडीटीपासून सुटका मिळवण्यासाठी रव्याच्या पुऱ्यांऐवजी पिठाच्या पुऱ्या वापरा. काळीमीरी, जिऱ्याची पूड आणि साध मीठं घालून पाणी पाणीपुरीचं पाणी तयार करावं. या सर्व पदार्थांमुळे अॅसिडिटी काही वेळातच दूर होण्यास मदत होईल.
अशावेळी मूड रिफ्रेश करण्यासाठी काहीतरी थंड पिण्याची अथवा खाण्याची इच्छा होते. अशावेळी पाणीपुरी उत्तम उपाय ठरू शकतो.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.