कॉफी व ग्रीन टी चे सेवन हृदयाच्या आरोग्यासाठी फार चांगले मानले जाते.



ग्रीन टी चे नियमितपणे सेवन केल्यास तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढेल.



ग्रीन टी वजन कमी करण्यास मदत करते व मधुमेह देखील नियंत्रणात राहतो .



मात्र ग्रीन टी च्या अतिसेवनामुळे तुमच्या झोपेवर परिणाम होऊ शकतो.



तर कॉफीमध्ये व्हिटॅमिन बी 2,व्हिटॅमिन बी 3,मॅग्नेशियम, पोटॅशियम, विविध फिनोलिक संयुगे आणि अँटीऑक्सिडंट्स यासारखे पोषक तत्वे असतात.



कॅफिन लठ्ठपणा कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.



कॉफीच्या सेवनाने यकृताच्या कर्करोगाचा धोका कमी होतो.



मात्र कॉफीच्या अतिसेवनामुळे पचनसंस्थेवर नकारात्मक परिणाम होतो.व पोटासंबंधी अनेक समस्या उद्भवू शकतात.



ग्रीन टीमध्ये असलेले पॉलीफेनॉल नावाचे घटक कॅफिनचे हानिकारक प्रभाव काढून टाकतात, ज्यामुळे ते आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरते.



कॉफी व ग्रीन टी चे सेवन रिकाम्या पोटी करू नये.