उसाचा रस आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

त्यात भरपूर अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर असतात.

उसाचा रस आरोग्यासाठी उत्तम प्रतिकारशक्ती वाढवणारा स्त्रोत आहे असेही म्हटले जाते.

पण उसाचा रस खूप गोड असून मधुमेहाच्या रुग्णांसाठी घातक आहे.

ऊसाच्या रसात सुक्रोज असते म्हणजेच त्यात नैसर्गिक गोडवा असतो.

उसाच्या रसामध्ये 70 टक्क्यांहून अधिक पाणी असते.

ह्यामध्ये फिनोलिक आणि फ्लेव्होइड्सही आढळतात जे शरीरासाठी चांगले असतात.

मात्र यामध्ये असलेले उच्च सुक्रोज शरीरातील रक्तातील साखर वाढवू शकते.

एक ग्लास उसाचा रस शरीरात भरपूर साखर घालू शकतो.

मधुमेहाच्या रुग्णांनी रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी उसाचा रस पिणे टाळावे.