अनेक आजारांपासून त्यामुळे आपली सुटका होते. फळांचा ज्युस पिल्याने आपल्याला त्यातील पोषक घटक मिळतात असा तुमचा समज असेल तर तो चुकीचा आहे.
उलट फळांचा ज्युस पिण्यापेक्षा त्यांना खाणे अधिक योग्य असते. परंतू हल्लीच्या धावपळीच्या युगात कोणाला फळांना सोलून खाण्याची सवड नसते.
त्यामुळे फळांचा ज्युस पिण्याला अनेक जण प्राधान्य देत असतात. अनेकदा फळांचे ज्युस आपण नाश्ता करताना पित असतो.
परंतू सकाळी उठल्या उठल्या उपाशीपोटी फळांचा रस पिण्याचे अनेक तोटे आपल्याला होऊ शकतात..
जेव्हा आपण रात्री झोपतो तेव्हा आपले शरीर मेन्टेनन्स करीत असते. त्यावेळी आपल्या पोटात अनेक प्रकारचे केमिकल्स निघत असतात.
पचनासाठी एसिड निघत असते. पचनप्रक्रीये दरम्यान बायप्रोडक्टच्या रुपात एसिड जमा होत असते. हे गरजचे असते.
हिरव्या भाज्या पालक किंवा ब्रोकलीत ऑक्जेलिक एसिड असते आणि फळांत साइट्रीक एसिड असते.
ज्यांना मधूमेहाचा त्रास आणि किंवा गॅसेसचा त्रास आहे त्यांनी सकाळचा रस पिण्याच्या फंद्यात पडू नये.
दिवसाचे लंच आणि रात्रीच्या डीनरच्या अगोदर काही तास आधी ज्यूस पिण्यासाठी योग्य वेळ आहे.
म्हणजेच सकाळच्या नाश्त्यानंतर अर्ध्या तासाने तु्म्ही ज्यूस प्यायला तरी चालेल. कारण त्यावेळी शरीरात असिडचे प्रमाण इतके नसते.
(वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)