बरेच लोक अन्नाशी संबंधित कोणताही पदार्थ खरेदी करण्यापूर्वी त्याची एक्सपायरी डेट तपासतात.
जर त्या वस्तूची एक्सपायरी डेट जवळ आली असेल किंवा निघून गेली असेल तर साधारणपणे ती खरेदी केली जात नाही.
जेव्हा एखाद्या पदार्थाची एक्सपायरी डेट निघून जाते, तेव्हा सामान्यतः लोकांचा असा विश्वास असतो की, एक्सपायरी झाल्यानंतरही ती वस्तू आरोग्यासाठी लगेच हानिकारक ठरत नाही.
असे मानले जाते की बऱ्याच गोष्टींमध्ये एक्सपायरी डेट सुरक्षिततेपेक्षा गुणवत्तेच्या आधारावर अधिक निश्चित केली जाते.
उदाहरणार्थ, हे शक्य आहे की चिप्स किंवा बिस्किटे काही काळानंतर कुरकुरीत राहू शकत नाहीत, परंतु याचा अर्थ असा नाही की ते खाल्ल्याने तुम्ही आजारी पडाल.
मात्र जर दूध किंवा मांस असेल तर ते लवकर खराब होऊ शकते. या गोष्टींमध्ये बॅक्टेरिया लवकर वाढू लागतात आणि त्यानुसार त्यांची एक्सपायरी डेट ठेवली जाते.
मसाले वर्षानुवर्षे खराब होत नाहीत एखाद्या वस्तूची एक्सपायरी डेट निघून गेली असेल तर आधी त्याचा वास आणि चव नीट तपासली पाहिजे.
ती वस्तू कोणत्या स्थितीत दिसते हेही पाहिले पाहिजे.
एक्सपायरी डेट विविध चाचण्यांवर आधारित असते
(वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.)