चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवण्याचा रामबाण उपाय म्हणजे चंदन.याचा लेप लावल्यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या नाहीशा होतात.

यातील अॅन्टीबॅक्टेरीयल तत्त्व चेहऱ्यावरील बॅक्टेरीया नष्ट करून चेहरा उजळ बनवतात.

लिंबू पाण्याने चेहरा धुतल्यास चेहऱ्यावरील मृत पेशी तसेच सर्व प्रकारचे डाग नाहीसे होऊन चेहरा नितळ होतो.

कोरफडीमुळे चेहऱ्यावरील मॉईश्चर वाढते, चेहरा साफ बनतो. तसेच चेहरा स्मूथ होऊन त्वचा लवचिक बनते.

चांगल्या त्वचेसाठी गाढ झोप घेणं आवश्यक आहे,चांगली झोप घेतल्याने त्वचाही उजळते.रात्री किमान 8 तासांची झोप घ्यावी.

चेहऱ्याला सुरकुत्यांपासून वाचवण्यासाठी कोरडेपणापासून वाचवणे आवश्यक आहे, यासाठी दिवसातून दोनदा चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून मॉइश्चरायझ करा.

रोजच्या आहारात शक्यतो फळे आणि भाज्यांचा समावेश करा.

चेहऱ्याला सतेज ठेवण्यासाठी चांगला पर्याय असा आहे की तुम्ही जास्तीत जास्त पाणी प्या.

कमी पाणी पिल्यामुळे शरीराला आतूनच कोरडेपणा येतो आणि आपली स्किन लूज पडते.