हिवाळ्यात सर्दी आणि खोकला यांसारख्या समस्या जाणवू लागतात.

सध्या वातावरणामधला गारवा वाढला आहे,या हवामानात आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते.

कारण या ऋतुमध्ये लवकर आजारी पडण्याची शक्यता असते.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी रोजच्या आहारात या पदार्थांचा समावेश करू शकता.

बदाम आणि अक्रोड
हिवाळ्यात तुम्ही बदाम ,अक्रोड, मनुका आणि पिस्ते मिसळून हेल्दी ड्रायफ्रूट मिक्स तयार करू शकता.

ड्राय फ्रूट थंड वातावरणात तुमच्या शरीराला ऊर्जा देतात.म्हणूनच हिवाळयात या ड्रायफ्रूट्सचा समावेश केला पाहिजे.

शेंगदाणे
स्नॅक्स म्हणून तुम्ही भाजलेले शेंगदाणे खाऊ शकता.

त्यांचे सेवन केल्याने थंड वातावरणात तुमचे शरीर आतून उबदार राहते.

फॅट्ससोबतच शेंगदाण्यामध्ये लोह, फॉस्फरस, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि फोलेटसह अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात.

मखाना

हिवाळ्यात हेल्दी स्नॅक्ससाठी मखाना हा एक चांगला पर्याय आहे,पोषक तत्वांनी भरपूर असलेले माखना कोणत्याही ऋतूत खाऊ शकतो.