मीठ हे मर्यादेपेक्षा जास्त खाल्ल्यास आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

त्याचप्रमाणे जास्त मीठ खाल्ल्याने कोणते आजार होतात ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

जास्त मीठ खाल्ल्याने त्वचेचे आजार होऊ शकतात.शरीरावर खाज येण्याची समस्या वाढू शकते.

यामुळे शरीरात जळजळ, त्वचेवर वेदना आणि लाल पुरळ देखील होऊ शकतात.

जर तुमचे केस जास्त गळत असतील तर तुमच्या शरीरात सोडियमचे प्रमाण वाढले आहे.

जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्याने शरीरातील सोडियमचे प्रमाण वाढते.त्यामुळे केसांची मुळेही कमकुवत होतात.

जास्त मीठ खाल्ल्याने बीपीची समस्या वाढते.

जास्त मीठ खाल्ल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे.यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.