शिंगाडा हे एक फळ आहे जे आपल्या घरात क्वचितच खाल्ले जाते.

पण तुम्हाला माहिती आहे का,शिंगाडामध्ये अनेक गुणधर्म लपलेले आहेत,जे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतात.

उकडलेल्या शिंगाड्यामध्ये भरपूर जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात,जे आपल्या शरीराच्या अनेक गरजा पूर्ण करतात.

दम्याचा त्रास असलेल्या लोकांना शिंगाड्याचे उकडलेलं पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो .

कारण त्यात अँटी-ऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात.

पोटॅशियम, कॅल्शियम यांसारखे अनेक पोषक घटक उकडलेल्या पाण्यातील शिंगाडामध्ये आढळतात जे बीपी कमी करण्यास मदत करतात.

रोज उकडलेले शिंगाडे खाल्ल्यास रक्तदाब नियंत्रणात राहतो.

शिंगाड्याचे उकडलेलं पाणी पाणी महिलांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

गरोदरपणात शिंगाड्याचे पाणी सेवन केल्याने गरोदर स्त्रीचे आणि तिच्या गर्भाचे आरोग्य चांगले राहते.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे.यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.