जेवल्यानंतर अनेकांना ताबडतोब झोपण्याची सवय असते. पुरेशी झोपही आरोग्यास महत्त्वाची आहे. मात्र, जेवल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत झोपणंही घातक ठरु शकतं. तसेच अनेकांना जेवल्यावर लगेच सुस्ती येते. जेवल्यानंतर ताबडतोब झोपण्याने केवळ वजन घटत नाही तर अनेक आजार उद्भवतात. जेवण आणि झोपण्यामध्ये किमान एक ते दोन तासांचे अंतर असावे. पित्ताचा त्रास होण्याची शक्यताही असते. तातडीने झोपल्यास पचनप्रक्रियेत अडथळे निर्माण होतात आणि परिणामी पित्त वाढते. पचन प्रक्रियेचा वेग कमी होतो.