अनुष्का शर्मा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती तिचे सुंदर फोटो शेअर करत असते. अनुष्काने आज तिचे ‘सन किस्ड’ फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती निसर्गाचा आनंद लुटताना दिसत आहे. अनुष्काची ही स्टाईल तिच्या चाहत्यांना खूप आवडली आहे. हे अनुष्काचे जुने फोटो आहेत. तिने डेनिम्ससोबत पिंक कलरचा शर्ट परिधान केला आहे. अनुष्काचे हे विना मेकअप फोटो खूपच सुंदर दिसत आहेत. फोटोमध्ये अनुष्का पार्कमध्ये बसून हसत फोटो पोज देत आहे. अनुष्का शर्मा बऱ्याच दिवसांनी मोठ्या पडद्यावर परतणार आहे. नुकतीच तिने 'चकदा एक्सप्रेस' या चित्रपटाची घोषणा केली आहे.