बदाम रात्री भिजवून सकाळी त्याची साल काढल्याने तुमचे वजन झपाट्याने कमी होतेच.



शिवाय तुमची स्मरणशक्तीही तीक्ष्ण होते. बदामामध्ये चांगले फॅट असते जे तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते.



जर तुम्ही पचनाच्या समस्येने त्रस्त असाल किंवा अनेकदा पोटदुखीचा त्रास होत असेल तर रात्री दोन अंजीर पाण्यात भिजवून सकाळी खा.



सकाळी अंजीर खाल्ल्यास बद्धकोष्ठतेवर मात करता येते.



ओवा, जिरे आणि बडीशेप या तीन गोष्टी खाल्ल्याने तुमचे वजन नियंत्रित राहते.



जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल आणि तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवायची असेल, तर भिजवलेली मेथी तुम्हाला मदत करू शकते.



यासाठी मेथीचे दाणे रात्री पाण्यात भिजत ठेवावे आणि सकाळी सर्वप्रथम मेथीचे दाणे पाण्यासोबत घ्यावेत. यामुळे तुमच्या शरीरातील इन्सुलिनचे प्रमाण योग्य राहील.



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.