देशातील कोरोना विषाणूचा संसर्ग कमी होताना दिसत नाहीय गेल्या 24 तासांत देशात 16 हजारहून अधिक नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे तसेच सक्रिय रुग्णांची संख्याही एक लाखांच्या पुढे गेली आहे देशात शनिवारी दिवसभरात 16 हजार 103 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात मागील 24 तासांत 31 रुग्णांचा कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. देशातील कोरोनाचा संसंर्ग दिवसेंदिवस वाढत आहे भारतातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या एक लाखांच्या पुढे गेली आहे देशात सध्या कोरोनाचे 1 लाख 11 हजार 711 सक्रिय रुग्ण आहेत गेल्या 24 तासांत 13 हजार 929 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत आतापर्यंत एकूण 4 कोटी 28 लाख 65 हजार 519 रुग्ण कोरोना संसर्गातून मुक्त झाले आहेत.