घरी उपलब्ध असलेल्या गोष्टींच्या मदतीने तुम्ही ही क्रीम सहज तयार करू शकता.

हे रोज रात्री लावल्याने तुम्ही त्वचेच्या सर्व समस्यांपासून सहज सुटका मिळवू शकता,

तर चला जाणून घेऊया घरगुती हर्बल क्रीम कशी तयार करावी.

गुलाबजल आणि ऑलिव्ह ऑइलने नाईट क्रीम बनवण्यासाठी प्रथम सफरचंद सोलून त्याचे छोटे तुकडे करा.

नंतर हे तुकडे ऑलिव्ह ऑइलसह मिक्सरच्या भांड्यात टाकून चांगले बारीक करा.

यानंतर ही पेस्ट काढून मंद आचेवर गरम करा. नंतर थंड झाल्यावर त्यात गुलाबजल घालून मिक्स करा.

यानंतर तुम्ही ते रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा. ही क्रीम रोज ५-६ दिवस चेहऱ्यावर लावा.

चंदन आणि दही

यासाठी 9-10 बदाम बारीक करून पेस्ट तयार करा.

त्यानंतर साधारण अर्धा कप दही, 1 चमचा चंदन पावडर, हळद, केशर आणि लिंबाचे 2 ते 3 थेंब टाकून क्रीम तयार करा.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे.यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.