जेवणाबरोबर तोंडी लावायला चटणी असेल तर जेवणाचा स्वाद आणखी वाढतो. त्यामुळे अनेकदा घरी जेवणाबरोबर चटणी बनवली जाते. शेंगदाणा, खोबरे, पांढरे तीळ अशा अनेक चटण्या आपण घरी करतो आज आपण रोजच्या जेवणात वापरण्यात येणाऱ्या पौष्टीक कढीपत्त्याच्या चटणीची रेसीपी पाहणार आहे तव्यावर किंवा कढईत तेल गरम करा. त्यात कढीपत्त्याची पानं घाला. मंद आचेवर अधूनमधून परतत पानं कुरकुरीत होऊ द्या. कुरकुरीत झाली की थंड करा. तीळ लाल रंग येईपर्यंत भाजा. कढीपत्त्याची पानं आणि तीळ त्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करुन घ्या. त्यात तिखट-मीठ घाला आणि पुन्हा एकदा मिक्सरमध्ये फिरवा. खुप बारीक पूड करू नका भाकरी, पराठे किंवा पोळीसोबत ही चटणी उत्तम लागते