गूळ हा पदार्थ गरम असल्यामुळे गुळाचं सेवन करण्याला अनेकांची चहाला पसंती असते.



काहीजण नुसताच गूळ खाण्याऐवजी गुळाचा चहा पिण्याला पसंती देतात.



साखरेच्या तुलनेत गुळामध्ये अनेक व्हिटॅमिन असतात, ज्याचा शरीराला फायदाच होतो.



मायग्रेनचा त्रास असणाऱ्यांसाठीही हा चहा फायदेशीर ठरतो.



गुळामध्ये लोहाचं प्रमाण जास्त असल्यामुळं शरीरात रक्त कमी असल्यासही हा चहा प्यायल्यास हे प्रमाण नियंत्रणात येतं.



गूळ मुळातच एक गरम पदार्थ आहे. त्यामुळं गरम वातावरणात याचं सेवन केल्यास अनेकदा नाकातून रक्त वाहण्यासही सुरुवात होते.



गुळाच्या अती सेवनानं रक्तातील साखरेचं प्रमाणही वाढतं. 10 ग्रॅम गुळामध्ये जवळपास 9.7 ग्रॅम इतकी साखर असते.



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.