गुजरातमधील क्षमा बिंदू या मुलीने स्वत:सोबत (आत्मविवाह) लग्न केले आहे.

क्षमा हिने बुधवारी तिच्या वडोदरा येथील घरी मोठ्या धुमधडाक्यात विवाहसोहळा संपन्न झाला.

क्षमाने 11 जून रोजी स्वत: सोबत लग्न करण्याची घोषणा केली होती. परंतु, तिच्या या निर्णयानंतर तिच्यावर टीका झाली होती. त्यामुळे तिने जाहीर केलेल्या तारखेच्या तीन दिवस आधीच स्वत:सोबत लग्न केले.

क्षमा बिंदूने अखेरे स्वतःला दिलेले वचन पूर्ण केले आणि एका खास विवाह सोहळ्यात स्वत:सोबत लग्नगाठ बांधली. लग्नादरम्यान हळदी-कुंकवाचे विधी झाले, मेहेंदी झाली, क्षमायाचनाही झाल्या.

वडोदरा येथील गोत्री येथील घरात क्षमाने रितीरिवाजानुसार लग्न केले. मात्र, या लग्नात वर किंवा पंडित नव्हते.

क्षमाच्या काही खास मित्रांसह काही नातेवाईकांनी या लग्नाला हजेरी लावली होती.

भारतातील अशा प्रकारचा हा पहिलाच विवाह असल्याचे सांगण्यात येत आहे.

क्षमाने यापूर्वी 11 जून रोजी तिच्या लग्नाची घोषणा केली होती. तेव्हापासून त्यांच्या घरी सतत लोकांची वर्दळ होती.

याबाबत त्यांच्या शेजाऱ्यांनी विरोध केला होता. त्यामुळे क्षमाने ठरलेल्या तारखेपूर्वी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

कारण तिला भीती होती की कोणीतरी 11 जून रोजी तिच्या घरी येऊन वाद निर्माण करेल.

क्षमाने प्रथम मंदिरात लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, भाजपच्या काही नेत्यांनी तिच्या या निर्णयाला विरोध केल्यानंतर तिने आपला निर्णय बदलून घरीच लग्न केले.