हिंगोलीतील गिरगाव कुरुंदा भागात उत्पादन घेतल्या जाणाऱ्या केळीला देशभरात मागणी असते.



वादळी वाऱ्यामुळे या भागातील शेकडो एकर शेत जमिनीवरील केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्या



कुरुंदा गिरगाव शिवारातील केळीच्या बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.



केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे



हजारो रुपये खर्च करुन लहानाचे मोठे केलेल्या केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या



वादळी वाऱ्यामध्ये शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावला



या बागांसोबत शेतकऱ्यांचे स्वप्न सुद्धा नष्ट झाल्याने त्यांच्या डोळ्यात पाणी आहे.



मागील दोन वर्षाचे नुकसान यावर्षी भरुन निघेल अशी अपेक्षा होती



परंतु तसे न होता वादळीवाऱ्यात सर्व बागा जमीनदोस्त झाल्या