लहान मुलांपासून वयस्कर माणसांपर्यंत सर्वांच्याच आरोग्यासाठी अंड हे अत्यंत लाभदायक मानले जाते.

पण अंडी ताजी व चांगली नसतील तर यामुळे आपल्या आरोग्यावर देखील नकारात्मक परिणाम होऊ शकतात.

अशा परिस्थितीत अंडी ताजी आहेत की खराब हे कस ओळखायचं

आपण भारतीय लोक कोणत्याही पदार्थाच्या सुगंधावरूनच ओळखू शकतो की तो पदार्थ चांगला आहे की खराब झाला आहे

अंडी ताजं आहे की जुनं, खराब आहे की चांगलं हे पाहण्याचा सर्वात जुना आणि रामबाण उपाय आहे तो म्हणजे अंड पाण्यात टाकून बघणं.

यासाठी डब्ब्यात पूर्ण भरून पाणी घ्यावं लागेल. यानंतर अंड त्या पाण्यात टाकावं लागेल.

जर अंड बुडून पाण्याच्या तळाला गेलं तर समजून जा की ते चांगलं व ताजं आहे.

अंडे बाहेरून नीट पाहा की त्याच्या कवचातून पावडर तर पडत नाही ना?

किंवा कुठे छिद्र तर नाही ना? असं बॅक्टेरियामुळे होऊ शकतं.

असं वाटल्यास एका वाटीत अंडे फोडून ओता. त्यात निळा,हिरवा किंवा काळ्या रंगाची काही घाण दिसत असेल तर ते अंडे ताबडतोब फेकून द्या.