हिवाळ्यात आरोग्याची काळजी घेण्याची फार गरज असते. कारण हिवाळ्यात रोग प्रतिकारक शक्ती कमी असते.

हिवाळ्यात दही खाण्याविषयी असलेले अनेक समज-गैरसमज आहारतज्ञांनी खोडून काढले आहेत.

दही हे अतिशय पौष्टिक अन्न मानले जाते.त्यात चांगल्या दर्जाचे प्रथिने असतात.

हिवाळ्यात दही खाल्ल्याने आराम मिळतो, दही मेंदूमध्ये ट्रिप्टोफॅन नावाचे अमीनो ऍसिड सोडते जे मेंदूच्या कार्यांना गती देण्यासाठी उपयुक्त आहे.

दह्यामध्ये अनेक गुण असतात,निरोगी आणि चमकदार त्वचेसाठी हे फायदेशीर आहे.

त्वचेला कोरडेपणापासून वाचवण्यासाठी त्यात नैसर्गिक मॉइश्चरायझिंग घटक असतात.

ज्या लोकांना चेहऱ्यावर मुरुमे येतात त्यांच्यासाठी दही हे उपयुक्त ठरते.

दह्यामध्ये भरपूर जीवनसत्त्वे, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि प्रथिने असतात.

दह्यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी सर्दी आणि खोकल्यावरील उपचारांसाठी एक चांगला उपाय आहे.