म्हणूनच जे लोक मांस आणि चिकन खात नाहीत त्यांनाही अंडी खायला आवडतात.



मात्र, याचे जास्त सेवन केल्यास अनेक आजारही होऊ शकतात.



जास्त अंडी खाल्ल्याने शरीराला हानी पोहोचते. शरीरात उष्णता, अस्वस्थता, खराब पचन, उलट्या यांसारख्या समस्या असू शकतात.



अमेरिकन हार्ट असोसिएशननुसार, जे लोक हेल्दी डायट घेतात आणि ज्यांना कोलेस्ट्रॉलशी संबंधित समस्या नाही, ते दिवसातून 2 अंडी खाऊ शकतात.



ज्या लोकांमध्ये कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त आहे त्यांनी 1 अंड खावं.



ज्या लोकांना हृदयाची समस्या आहे त्यांनीदेखील 1 अंडी खावीत.